संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

संजय राऊत यांच्या जामिनासाठी सुनिल राऊत थेट दिल्लीत पोहोचले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महिना उलटला तरी ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांना मातोश्री वरून नुकतेच बोलावणे आले होते. त्यानंतर संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिल्लीत धाव घेतली आहे. वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.

संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात असून त्यांनी प्रथमच जामीनासाठी देखील अर्ज केला आहे.१६ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. ईडीला जामिनासंदर्भात काय म्हणणं आहे याबाबत कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भातच वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.

नुकतीच सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुनील राऊत म्हणाले की, सुनील राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला भेटालया बोलावले होते. त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली. सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami