मुंबई:- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मिस्टर पोपटलाल असा त्यांचा उल्लेख करत त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे ट्विट राऊतांनी केले आहे. “किरीटयमय्या उर्फ भाजपाचे पोपटलाल माझ्याविरोधात तथ्यहिन आरोप करत असून, शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली असून, मिस्टर पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस बजावणार आहे. सत्याचा लवकरच विजय होईल, जय महाराष्ट्र…!”
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे कथित दापोलीतील रिसॉर्टप्रकरण सोमय्यांनी उचलून धरले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा एसआरए घोटाळा, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंचा मार्वेतील स्टुडिओ, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही किरीट सोमय्या सातत्याने टीका करत असतात. त्यामुळे संजय राऊत आता किरीट सोमय्यांविरोधात थेट कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.