संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

संजय राऊतांचा जामिनासाठी अर्ज! आज सुनावणी होण्याची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर न्यायालयाने उद्या शुक्रवारी सुनावणी घेण्याची शक्यता आहे. आता त्यांची जामिनावर सुटका होणार की नाही? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत हे आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. 5 सप्टेंबरला कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते आणि त्यांना आता 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज दुपारी संजय राऊत यांच्या वकीलांनी त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. उद्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami