संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

संजय पांडेंवर ३ गुन्हे दाखल; मुंबई, पुण्यासह १८ ठिकाणी सीबीआयचे छापे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात सीबीआयने नवीन तीन गुन्हे दाखल केले आहेत. एनएसई घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पांडे यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सीबीआयने पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवर छापेमारी सुरू केली असून मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचे कळते आहे.

संजय पांडे यांना सेवानिवृत्त होताच सक्तवसुली संचालनालयाने ५ जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले होते. नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. त्यानंतर २००९ ते २०१७ या काळात एनएसई कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने संजय पडेंविरोधात गुन्हा दाखल केला.

सीबीआयने याप्रकरणी १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. यात मुंबईत ८, पुण्यात २, चंदीगड १, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक, तर दिल्ली एनसीआरमध्ये ५ छापे टाकण्यात आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami