संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये पुन्हा हर्षवर्धन देशमुखांचीच सत्ता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती- स्वातंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली व राज्यातील द्वितीय क्रमांकाची संस्था असलेल्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रगती पॅनलने एकतर्फी विजय मिळविला आहे. या निवडणुकीत माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या विकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.रात्री हा निकाल आल्यानंतर देशमुख समर्थकांनी मोठा जल्लोष केला. विदर्भातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या ९ पदाकरिता रविवारी मतदान झाले.श्री शिवाजी शिक्षण संस्थेत एकूण ७७४ मतदार आहेत.यापैकी ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक पदाच्या जागेवर प्रगती पॅनलने बाजी मारली आहे.यात सलग दुसऱ्यादा हर्षवर्धन देशमुख अध्यक्षपदावर विराजमान झाले.प्रगती पॅनलने ९ पैकी ८ जागा जिंकल्या आहेत. देशमुख यांना ३९७ तर ठाकरे यांना २७० मते मिळाली आहेत.प्रतिस्पर्धी विकास पॅनलने एक जागा जिंकली.दरम्यान काल शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूकीवेळी एका मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami