संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

श्रीलंकेने भारताकडे मागितली ५५ दशलक्ष डॉलरची मदत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलंबो – १९४५ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस, इतर इंधन, टॉयलेट पेपर, माचिस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशातच आता श्रीलंकेने खत खरेदीसाठी भारताकडे मदत मागितली आहे. युरिया खरेदी करण्यासाठी श्रीलंकेने भारताकडे ५५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत मागितली आहे. दरम्यान, ‘भारताने श्रीलंकेला इंपोर्ट-एक्सपोर्ट बँकेकडून ५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचे मान्य केले असून हे कर्ज २०२२-२३ हंगामात युरिया खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे’, असे श्रीलंका सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतील कृषी संकटासाठी जबाबदार धरले जात आहे. त्यांनीच देशात रासायनिक खतांच्या आयातीवर बंदी घातली होती, त्यांच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. मात्र राजपक्षे सरकारने आम्ही देशात सेंद्रिय खत वापरणार असून हरित शेती धोरणासाठी छोटासा प्रयत्न असल्याचे त्यावेळी सांगितले होते. परंतु आज देशातील कृषी क्षेत्रात ५० टक्के पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी सांगितले की, ‘सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी तातडीने पावलं उचलली तर येत्या पाच ते सहा महिन्यांत अन्नाच्या सध्याच्या टंचाईवर मात करता येईल.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami