संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

श्रीलंकेत पेट्रोल ४१० रुपये लिटरतर डिझेल तब्बल ४३० रूपयांवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलंबो-श्रीलंका सरकारने आता पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर ४० रुपयांची कपात केली आहे.तरीही देशात पहिल्यांदाच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.श्रीलंकेत आता पेट्रोलपेक्षा डिझेल महागले आहे.

श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी काल शनिवारी १ ऑक्टोबर रोजी पेट्रोलच्या किमतींत कपात करण्याची घोषणा केली आणि सांगितले की, पेट्रोलचे नवे दर आता ४१० श्रीलंकन ​​रुपये प्रति लिटर असेल.पेट्रोलच्या किमतीत कपात करण्यापूर्वी पेट्रोल ४५० रुपये प्रति लिटरने विकले जात होते.सरकारच्या या निर्णयानंतर लंका इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सरकारी किंमतीच्या पातळीनुसार, पेट्रोलच्या दरांत कपात करणार असल्याचे सांगितले आहे.श्रीलंकेत डिझेलची किंमत अजूनही ४३० श्रीलंकन ​​रुपये प्रति लिटरवर कायम आहे.अशाप्रकारे डिझेलचे दर आता पेट्रोलपेक्षा जास्त झाले आहेत.गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण होत आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली आली आहे. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत चार महिन्यांहून अधिक काळ कोणताही बदल केलेला नाही.अशा परिस्थितीत देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

दरम्यान, श्रीलंका सध्या आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत आहे.येथील महागाई ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. ऑगस्टमधील ६४.३ टक्क्यांवरून सप्टेंबरमधील महागाई वाढून ६९.८ टक्के झाली आहे. डिझेलच्या दरांत कपात झाल्यास नागरिकांना महागाईवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, श्रीलंका सरकारने पेट्रोलच्या किमतींवरच दिलासा दिला आहे. येत्या काळात सरकार डिझेलच्या किमतीही घटवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami