संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

श्रीलंकेत कार्यालय-शाळा बंद; इंधन बचतीसाठी सरकारची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलंबो – गेल्या अनेक दिवसांपासून गरिबीचा सामना करणारा श्रीलंका सध्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत इंधनाच्या तीव्र टंचाईमुळे सरकारने शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. सोमवारपासून या शाळा आणि सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. वीज पुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने कोलंबो शहरातील सर्व सरकारी कार्यालये आणि खाजगी शाळांच्या शिक्षकांना पुढील आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग घेण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या इंधनाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणि अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, इंधन पुरवठ्यावरील निर्बंध, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि खाजगी वाहनांच्या वापरामुळे येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन सरकारी कार्यालये आणि शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिपत्रकानुसार, सोमवारपासून सरकारी कर्मचारी आणि शाळा बंद राहणार असून केवळ आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी काम करणार असून त्यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही. विशेषतः श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक आणि राजकीय संकटाशी झुंज देत आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अन्नपदार्थ, औषध, स्वयंपाकाचा गॅस, इंधन आणि टॉयलेट पेपर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी खरेदीसाठी लोकांना तासनतास दुकानाबाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे. इतिहासात पहिल्यांदाच श्रीलंका परकीय कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारने यावर्षी आयएमएफसह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून $५ अब्ज डॉलर्सची मदत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami