संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

श्रीलंकेत आंदोलक शिरले राष्ट्रपती भवनात; जेवणावर मारला ताव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलंबो – २ कोटी २० लाख लोकसंख्या असलेले श्रीलंका बेट सध्या तीव्र आर्थिक संकटातून जात आहे. दोन वेळच्या जेवणासाठीही तेथील जनतेला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. या गरिबीला सरकार जबाबदार आहे, असा संताप व्यक्त करत ही जनता गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहे. शनिवारी या आंदोलकांनी अखेर अध्यक्षांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला. त्यांचा तीव्र रोष पाहता पोलीसही त्यांना रोखू शकले नाहीत. राष्ट्रपती भवनात घुसल्यानंतर आंदोलकांनी अध्यक्षांसाठी असलेल्या सुविधांचा पुरेपूर लाभ घेतला.

गरिबीत होरपळून निघालेल्या या जनतेने अध्यक्षांच्या जिममध्ये व्यायाम करून घाम गाळला, मग स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त उड्या मारल्या आणि किचनमधील जेवणावर जोरदार ताव मारला. बऱ्याच दिवसांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. तर दुसरीकडे ही परिस्थिती पाहून पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आणि राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. तसेच शुक्रवारीच अज्ञातस्थळी गेलेले अध्यक्ष गोताबया राजपक्षे हे येत्या बुधवारी राजीनामा देणार आहेत. संसदेचे सभापती महिंदा अबेयवर्धने यांनी शनिवारी रात्री उशिरा याबाबत घोषणा केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami