सिडनी – श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज दनुष्का गुणतिलकाला ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत अटक झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय मायदेशी परतला. बलात्काराच्या आरोपावरून गुणतिलकाला अटक करून पोलिसांनी सिडनी ठाण्यात नेले. तीन आठवड्यांपूर्वी गुणतिलका जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी आशेन बंडाराला संघात स्थान मिळाले होते.
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाला गेला होता. दनुष्का गुणतिलकाचा संघात समावेश होता. ५ नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध श्रीलंकेचा सामना झाला. या मॅचमध्ये दनुष्का खेळला नव्हता. या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला. आज ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी गुणतिलकाला अटक केली. २ नोव्हेंबरला महिलेवर बलात्कर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कथित बलात्कार प्रकरणी त्याला अटक करून सिडनी ठाण्यात पोलिसांनी नेले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ गुणतिलकाशिवाय मायदेशी रवाना झाला. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. या स्पर्धेत श्रीलंका संघाने केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. मालिकेत गुणतिलका नामिबीया विरुद्ध खेळला होता. परंतु त्यात त्याने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती.