कोलंबो – श्रीलंका पुन्हा एकदा आर्थिक अडचणीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे दिसत आहे.श्रीलंकेवर आर्थिक संकट घोंगावू लागले आहे.मागील वर्षभरात श्रीलंकन रुपया ४५ टक्क्यांनी कोसळला आहे तर परकीय गंगाजळीत ५०० दशलक्ष डॉलर्सनी घट झाली आहे.
गेल्यावर्षी २०२२ मध्ये श्रीलंकेतील महागाई दर १७ टक्क्यांवर पोहोचला होता. यामुळे लोकंवर पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन खरेदी करण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली होती.
मात्र आताही श्रीलंकेच्या परदेशी गंगाजळीत ५०० दशलक्ष डॉलर्सची घसरण झाली आहे.मागील वर्षभरात श्रीलंकन रुपया ४५ टक्क्यांनी कोसळला.
यामुळे १ अमेरिकन डॉलरची किंमत येथे ३६५ रुपये झाली आहे.या आर्थिक तुटवड्यामुळे सरकारने येत्या ९ मार्च रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर टाकली आहे. निवडणुकीच्या नव्या तारखांची घोषणा ३ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे,चीनने आयएमएफ व पॅरिस क्लबच्या मदतीने कर्जाच्या अटींवर फेरविचार करण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारने देशाचे परदेशी चलन भंडार २ अब्ज डॉलर्सवर आल्याचा खुलासा केला आहे.यातील १.५ अब्ज डॉलर्स चीनने बॅलेंस ऑफ पेमेंट्स म्हणून दिलेत. श्रीलंकेला आपल्या कर्जाची परतफेड करता आली नाही तरच या पैशांचा वापर करावा लागेल.