संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

शोपियानमध्ये जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार, शस्त्रास्त्र जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शोपियान : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोपियानमध्ये द्रास भागात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, अमित शहा श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही तासांनी ही चकमक सुरु झाली. त्यावर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
जम्मू-काश्मीरच्या  शोपियानमधील द्रास भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयित जागेला वेढा घातताच तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. शोपीयानमध्ये द्राच आणि मुलू हे दोन भाग आहेत. शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत द्राच भागात जैश -ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आणि मुलू भागात सुरक्षा दलांनी लष्कराच्या एका दहशतवाद्याला ठार केले. दहशतवाद्यांकडून 47 2A रायफलसह शस्त्रेही जप्त करण्यात आली. द्राचमधील तीनपैकी दोन दहशतवादी हे तीन दिवसांपूर्वी पुलवामा येथे एसपीओवर हल्ला करणाऱ्यांपैकी होते.दरम्यान, अमित शहा श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही तासांनी ही चकमक झाली असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या