संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उंब्रज -शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील तासवडे गावात घडली आहे . या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर विहिरीतील पाण्याच्या पंपासाठी विजेचे नवे कनेक्शन बसवताना आवश्यक ती काळजी न घेतल्याबद्दल विहीर मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तासवंडे गावात रघुनाथ जाधव यांची विहीर आहे. चार दिवसांपूर्वी या ठिकाणी वीज पंपासाठी नवी जोडणी करण्यात आली होती शुक्रवारी सायंकाळी याच गावातील शिंदे कुटुंबातील ५ जण विहिरी लगत असलेल्या झाडाची फुले तोडण्यासाठी गेले होते. मात्र फुले तोडताना त्यांना शॉक लागला आणि हिंदुराव शिंदे ५८,त्यांची वाहिनी सीमा शिंदे ४८ आणि तिचा मुलगा शुभम शिंदे २३ याना शॉक लागला आणि तिघे विहिरीत पडले .यात तिघांचाही मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील निलेश शिंदे आणि विनोद शिंदे हे सुदैवाने बचावले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच गावातील लोक घटनास्थळी धावले . प्रथम वीज पंपाचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला . त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले . पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले या घटनेनंतर विहीर मालक रघुनाथ जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami