संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

शेगावात जागेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाला पाहून मालकाचा धसक्याने मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

* व्यापाऱ्यांनी पुकारला बंद
*पोलीस ठाण्यावर ठिय्या

बुलढाणा -जीनसह घराचा अवैधपणे ताबा घेण्यासाठी आलेल्या अकोल्यातील ४० ते ५० जणांच्या जमावाला पाहून धसका घेतल्याने शेगावचे प्रतिष्ठित नागरिक संजय मुरारका यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांसह व्यापारी व शहरातील नागरिकांनी सकाळी पोलिस स्टेशनवर धडक मूक मोर्चा काढून मुरारका यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत पोलिस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान,पोलिसांनी ४० ते ५० लोकांविरोधात गुन्हे केले आहेत.तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी शहरातील व्यापाऱ्यांनी शेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आला होता.
शनिवारी दुपारच्या सुमारास येथील महाराजा अग्रसेन चौकातील मुरारका जीनची जागा खाली करून घेऊन त्याचा ताबा घेण्यासाठी अकोल्यावरून ४० ते ५० लोकांचा जमाव आला होता. या जमावाने घराचा ताबा घेताना सामानाची मोठी नासधूस केल्याने मुरारका कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर घटनेची माहिती मिळताच मुरारका यांच्याशी संबंधित मित्रमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली.या अनपेक्षित प्रकारामुळे अग्रसेन चौकात बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेबाबत सविता संजय मुरारका यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुरारका यांच्या घराजवळ पोलिसांची व्हॅन उभी करून गस्त लावल्याचे दिसून आले.मात्र या वादावादीनंतर संजय मुरारका यांना हृदयविकाराचा झटका आला.यामध्ये त्यांना प्रथम शेगावात व नंतर अकोल्यात हलवले होते.मात्र रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि व्यापाऱ्यांनाही सकाळी पोलिस स्टेशनवर मूक मोर्चा काढला.यानंतर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत नागरिकांनी तेथेच ठिय्या दिला. सायंकाळी मुरारका यांचा मृतदेह ठाण्यात आणून ठेवणार असा इशारा दिला. या प्रकरणात पोलिसानी शैलेश सुधाकर खरोटे, रा. अकोला, सचिन सुहास कोकाटे, रा. अकोला, दीपक रामचंद्र मसने. रा. वाडेगाव ता. बाळापूर, सचिन विजय पोरपुटवार आणि ४० ते ५० महिला व पुरुष यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.आरोपी फरार झाले आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami