संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

शेअर बाजार कोसळला; काही मिनिटांतच गुंतवणुकदारांचे पाच लाख कोटी बुडाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शेअर बाजारात गेल्या कित्येक दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरू आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे जवळपास साडेपाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज, सोमवारी सकाळी सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरून ५३,१८४.६१ अंकांवर उघडला. तर निफ्टी ३०० अंकांहून अधिक घसरून १५,८७७.५५च्या पातळीवर उघडला. पुढे व्यवहारादरम्यान सेन्सेक्स १,५६८ अंकांनी घसरून ५२,७३४.९८ अंकांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. त्याचवेळी निफ्टीने सुमारे ४५० अंकांच्या घसरणीसह १५,७४९.९०ची नीचांकी पातळी गाठली होती.

दरम्यान, भारतीय रुपया विक्रमी घसरणीसह ७८.१६ प्रति डॉलरवर आला आहे. यूएस फेडकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि कच्च्या तेलातील अस्थिरता यामुळे रुपया प्रथमच या पातळीवर घसरला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. अमेरिकेतील महागाई ४०वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. अमेरिकेतील महागाईने विक्रमी पातळी गाठल्यामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करेल अशी अपेक्षा आहे. तसेच कच्च्या तेलाच्या दरात अस्थिरता आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami