संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ५२० अंकांनी कोसळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोघांमध्येही सुमारे १-१ टक्क्यांच्या घसरणीने झाली.

आज प्री-ओपन सत्रातच बाजार घसरला होता. सत्र सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी १०० अंकांपर्यंत खाली आला होता. सकाळी ०९:२० वाजता सेन्सेक्स सुमारे ४६० अंकांच्या घसरणीसह ५५,२२० अंकांच्या खाली व्यवहार करत होता, तर निफ्टी १४० अंकांच्या घसरणीसह १६,४३० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता.

यापूर्वी सोमवारीदेखील बाजारात मोठी अस्थिरता होती. एकवेळ सेन्सेक्स ५५,८३२.२८ अंकांच्या उच्चांकावर पोहोचला होता, तर ५५,२९५.७४ अंकांच्या नीचांकी पातळीवरही आला होता. शेवटी व्यवहार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ९३.९१ अंकांनी (०.१७ टक्के) घसरून ५५,६७५.३२ अंकांवर बंद झाला आणि निफ्टी १४.७५ अंकांच्या (०.०८९ टक्के) घसरणीसह १६,५६९.५५ वर होता. त्यानंतर आज सेन्सेक्स ५२० अंकांनी घसरून ५५,१५३ वर उघडला, तर निफ्टी १५२ अंकांनी घसरून १६,४१७ वर उघडला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami