संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

शेअर्स कोसळले! १ दिवसात मस्क, अदानींचे २५.१ अब्ज डॉलर्स बुडाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- शेअर बाजारात टेस्ला आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांत सोमवारी मोठी घसरण झाली. त्यामुळे टेस्लाचे एलन मस्क आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांचे एका दिवसात २५.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. अदानी समूहाच्या ६ प्रमुख कंपन्यांचे समभाग तोंडावर आपटले. त्यामुळे त्यांची ९.६७ अब्ज डॉलरची संपत्ती एका दिवसात गायब झाली. टेस्लाच्या समभागातही सोमवारी ८.६१ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे मस्क यांची १५.५ अब्ज डॉलरची संपत्ती बुडाली.

अदानी समूहाच्या अदानी पावर, अदानी विल्मर, अदानी एंटरप्राइजेस, अदानी स्पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोट गॅस या कंपन्यांच्या समभागांत सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे गौतम अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ९.६७ अब्ज डॉलर्सची घट झाली. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या समभागात सोमवारी ८.६१ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे त्यांना १५.५ अब्ज डॉलर्सचा फटका बसला. या २ उद्योगपतींची एका दिवसात २५.१ अब्ज डॉलर्सची संपत्ती घटली. अदानी विल्मरच्या समभागात ५ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे त्याला लोअर सर्किट लागले. अदानी समूहाच्या अन्य कंपन्यांच्या समभागातही ५ ते ८.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. जेफ बेजोस, बर्नार्ड अर्नाल्ट, मुकेश अंबानी या उद्योगपतींनाही शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami