संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

शिवसेनेवर एकही ओरखडा नसल्याचे सभेतून सिद्ध झाले!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षावर एकही ओरखडा आलेला नाही, हे कालच्या सभेनं सिद्ध झालं आहे, असा दावा शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी केला आहे. मुंबईतील नेस्को सभागृहात शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा काल पार पडला. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्याला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती.
अनिल परब म्हणाले की , “मनसेकडून फक्त इशारेच देण्याचं काम चालतं. कालच्या मेळाव्यानं शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नसल्याचं सिद्ध झालंय. कालच्या मेळाव्यावरुन सर्वांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळं कोण काय टीका करतंय याकडं आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष कामाकडे आणि मुंबईकरांच्या सेवेकडं आहे. त्यामुळं त्यांना जे वाटतं ते त्यांनी सांगितलं, आम्हाला जे वाटतं ते आम्ही सांगतो. ही राजकीय लढाई आहे ती चालूच राहणार. खरी शिवसेना काय हे इलेक्शन कमिशन आणि कोर्टाला ठरवायचं आहे. खरी शिवसेना कोणती हे काल लोकांनी बघितले आहे . त्यामुळं येत्या काळातचं याबाबत सर्व स्पष्ट होईल. कालच्या मेळाव्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केल्यानंतर अनिल परब यांनी हे भाष्य केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami