संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

शिवसेनेच्या राऊतांमुळे आमच्यात दरी पडली -शहाजीबापूंचे टीकास्त्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग : आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, त्यात शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. तसेच, या दोघांसोबतच आणखी दोघं-तिघं यासाठी कारणीभूत असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. टीका करत असताना शहाजी बापू पाटील यांनी यावेळी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. तसेच, आपल्या भाषणात शाहजीबापुंनी थेट विनायक राऊतांचा धुरळा पाडण्याचा चंगच बोलून दाखवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील एका खाजगी कार्यक्रमासाठी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आले होते. यावेळी त्यांनी राजकीय, सामाजिक विषयांवर भाष्य केले आणि ते या अगोदरही कोकणात फिरून गेले असल्यामुळे कोकणाचे वर्णन आपल्या खास शैलीत केले.
यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीत युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार असून,विजय मुरजी पटेल यांचाच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर सध्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं भेटीगाठींचे सत्र रंगल्याचे दिसत असताना, यासंदर्भात शहाजीबापूंना विचारले असता, ते म्हणाले की, “१०० टक्के येत्या काळात ही युती होऊ शकते.” यासंदर्भात तुमचे मत काय? अशी विचारणा केली असता, राज्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी अशी युती निश्चितपणाने व्हावी, असेही शाहजीबापू पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हावर शिख गटाने आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “ढाल तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. महाराजांनी आणि मावळ्यांनी ढाल तलवार हातात घेऊन हिंदवी स्वराज्य उभे केले होते. आमचे चिन्ह हे ऐतिहासिक परंपरेवर चिन्ह आहे. त्यामुळे शीख बांधवांनी असा दावा करणं चुकीचे असल्याचे म्हणत, शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव हे तात्पुरतं गोठवलेले आहे. हा निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी घेतलेला निर्णय आहे. अंधेरी पोटनिवडणूक झाल्यानंतर चिन्हाबाबत उत्तर मिळेल. कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी आमच्यावर भाजपमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. एकनाथ शिंदे समर्थपणे हा पक्ष चालवतील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ५० आमदारांचा पक्ष उद्या ९० आमदारांपर्यंत पोहोचेल असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami