संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

शिवसेना व शिंदे गटात तुफान राडा! पोलिसां समोरच हाणामारी,फेकाफेकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा- शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. त्यावेळी शिंदे गट -शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही होत आहे . यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदे गटातील सैनिक पळून गेल्याचे बोलाले जात आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते हे शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना त्या कार्यक्रमात घुसल्याचा आरोप केला जात आहे. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमारा करावा लागला. शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. यासंदर्भात अनेक चित्रफिती उपलब्ध असून पोलीस तपासत आहेत.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट निर्माण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून या दोन गटांमध्ये सतत वाद होत असून बुलढाण्यात आज दोन्ही गटात राडा झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami