मुंबई- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.ज्यामध्ये शिवकाळात लाईट कसे या प्रश्नावरुन आता नेटकऱ्यांनी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ट्रोल केले आहे.मात्र यावर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तो सेटवर लावलेला झुंबर असल्याचे म्हटले आहे.
ही महत्त्वाची चूक काही नेटिझन्सनी लक्षात आणून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात चालणाऱ्या अक्षय कुमारच्या मागे बल्बचे झुंबर दिसत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ते १६८० या काळात साम्राज्य केलं. थॉमस एडिसनने १८८० मध्ये बल्बचा शोध लावला, मग हे कसं काय?’ असा प्रश्न काही जणांनी विचारला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र
आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर केले आहे ज्यामध्ये शिवछत्रपतींची काही चित्र आहेत. ही तीन चित्र शेअर करताना आव्हाड यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमावर टीका केली. त्यांनी असे लिहिले आहे की, ‘जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढले जात आहे असे वाटते.’ आव्हाड यांनी थेट अक्षय कुमारचे नाव न घेता त्याच्या लूकवर केलेली ही टिप्पणी विशेष चर्चेत आली आहे.तर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तर झुंबरबाबत हास्यास्पद उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, तो सेटवरचा लाईट असू शकतो, सेटवर लाईट नसतात का? असा प्रति सवाल त्यांनी केला आहे.पण तो लाईट झुंबरच्या आकारात कसा हे त्यांना आलेले नाही.