संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

शिवरायांच्या अवमान प्रकरणी आज
उदयनराजेंचे राजगडावर आत्मक्लेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा: – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही यावरुन टीका केली होती. छत्रपतींच्या समाधींसमोर उदयनराजे आत्मक्लेष करणार आहेत. जलमंदीर पॅलेस या निवासस्थानातून निघाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदयनराजे म्हणाले,छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आपण व्यथित आहोत. त्यामुळेच मी रायगडावर जात आहोत, असे सांगितले. पुढे ते म्हणाले कोणत्या व्यक्तीविरोधात आमचे हे पा॒ऊल नाही. पण, शिवाजी महाजारांचा अपमान होत आहे. याविरोधात कोणीतरी बोलले पाहिजे. मी माझी जबाबदा टाळू शकत नाही. त्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. ज्या घराण्याचे नाव लावताना मी आवाज उठवला नाही. आम्ही नैतिक दृष्ट्या राहू शकत नाही. माझ्या उदयन या नावापुढे राजे लावतो. ज्यांच्यामुळे हे पद, सन्मान मिळाला ते नाव लावायचा मला अधिकार नाही. केवळ त्यांचाच अवमान नाही, तर जे महापुरुष ज्यांनी स्वत: आयुष्य वेचले आहे. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज विविध चळवळी, संघटना वाटचाल करत आहेत. त्यांनी योगदान दिले. त्यांची सुद्धा आज घुसमट होत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी एका पत्रकाराने याप्रकरणावर आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनी याचा नकार दिला. आपल्याला कोणीही फोन केलेला नाही आणि आपले कोणाशीही बोलणे झालेले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चेचे वृत्त फेटाळले. शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथे सगळे बोलतो असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami