संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

शिवभोजन थाळी सुरुच राहणार! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ठाकरे सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी सुरुच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला असल्याने ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरु होती. योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र आता ही योजना सुरुच राहणार असल्याचे जाहीर केल्याने गोर-गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवभोजन थाळी योजना अंतर्गत राज्यातील गोर-गरिब जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळते. कोरोना काळात या थाळीची किंमत ५ रूपये करण्यात आली होती. राज्यात १ लाख ८८ हजार ४६३ थाळ्यांची विक्री होते. याची संख्या २ लाखांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारने आणला होता. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाते.

दरम्यान,या योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा संशय ठाकरे सरकारला आहे. बोगस नावं, बोगस केंद्र असल्याचा संशय आहे. यामुळेच मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या योजनेचा आढावा घेतला. यामुळे ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ही योजना सुरु ठेवण्याची विनंती केली. त्यावर फडणवीस यांनीही ही योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन देऊन केवळ आढावा घेण्यात आल्याचे सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami