कोल्हापुर – केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी आणि कामगार विरोधी काळ्या कायद्याविरोधात कॉंग्रेस पक्षाने शिरोळमध्ये ‘शेतकरी ,मजदूर बचाव दिन” पाळत जोरदार आंदोलन केले.या आंदोलनात मोठ्या संख्येने ऊसउत्पादक सहभागी झाले होते.
यावेळी शिरोळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील,शिरोळ तालुका समन्वयक शेखर पाटील,युवक कॉँग्रेसचे फैसल पटेल आदींसह कॉँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या कृषिप्रधान देशामध्ये शेतकर्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन उभे करण्यात आले असून याची केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली.