वसई- अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझान खानच्या जामीन अर्जावर आज वसई कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने उद्याच्या सुनावणीत पोलिसांना अंतिम बाजू मांडण्याचे आदेश दिले आहे. ही बाजू ऐकल्यानंतर कोर्ट त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी कधी घायची हे ठरवणार आहे.
कोर्टाच्या बाहेर शिझान खानच्या वकीलांनी माध्यमांना सांगितले की, याप्रकरणी शिजानविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राशिवाय शिझानविरोधात अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. त्यांना जामिन मिळण्याची दाट शक्यता आहे.
तुनिषा शर्मा ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री होती. तिचे शिझानसोबत प्रेमसंबंध होते. 24 डिसेंबर 2022 रोजी भाईंदर येथे शुटींगच्या सेटवरील शीझानच्या मेकअप रुममध्ये तुनिषाने जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांनी शिझानला अटक केली होती.