संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

शिंदे साहेबांना सांगा, शाळा बंद करू नका! छात्रभारतीची एसटीवर पोस्टर्स

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

संगमनेर- २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे. त्याला शिक्षक संघटना आणि पालकांचा विरोध आहे. छात्रभारतीने याच्या विरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे. “शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ “सरकारी शाळा आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या मालकीच्या’ “मराठी शाळा वाचल्या पाहिजेत’, अशी पोस्टर्स छात्रभारतीने संगमनेर बस स्थानकात सुमारे १०० एसटी बसेसना लावली आहेत.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा मोठा फटका औरंगाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यांना बसणार आहे. या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या सरकारी शाळा बंद झाल्या तर येथील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गाव आणि वाड्यांमधील गरीब मुलांना खाशगी आणि शहरी शाळांमध्ये शिक्षण घेणे परवडणारे नाही. म्हणून सरकारने या शाळा बंद करू नयेत. मराठी शाळा जगल्या पाहिजेत, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्यासाठी त्यांनी संगमनेर बस स्थानकात १०० एसटींवर पोस्टर लावून शिंदे सरकारचे मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, माजी प्रदेशाध्यक्ष दत्ता ढगे, प्रदेश कार्यकारणीचे सदस्य गणेश जोंधळे आदी यावेळी उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami