संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

शिंदे सरकार राज्यातील ५६ शहरांमध्ये मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सामाजिक,आर्थिक स्थितीचा आढावा घेणार

मुंबई – आता शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांची पाहणी करण्याचे ठरवले आहे.त्यासाठी राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरांत समाजाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याचे काम मुंबईतील टाटा समाज विज्ञान या शैक्षणिक संस्थेला दिले आहे.
राज्यात २०१३ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते.तेव्हा मेहमूदर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समुदायाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी अभ्यास गट नेमला होता.या अभ्यास गटाने मुस्लिम समुदायाची पाहणी करण्यात यावी, अशी राज्य सरकारला शिफारस केली होती. मात्र त्यावर गेली १० वर्षे काहीच झाले नाही.मात्र राज्यात तीन महिन्यांपूर्वी आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र अवघ्या दोन महिन्यांत मेहमूदर रहमान समितीच्या शिफारशीवर अंमलबजावणी करण्याचे ठरवले असून पाहणीचे आदेश दिले आहेत. काल बुधवारी त्यासंदर्भातला शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभागाने जारी केला.
हे पाहणी करण्याचे काम करणाऱ्या टाटा समाज विज्ञान संस्थेला ३३ लाख ९२ हजार ४० रुपये मंजूर केले आहेत. दरम्यान, आता तब्बल ९ वर्षांनंतर सरकारने याला मुहूर्त लावल्याने यावर मोठ्या प्रमाणात राजकारण आहे. दुसरीकडे अनेक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एकूणच या मुद्यावर वातावरण तापणार आहे. राज्यात मुस्लिमबहुल ५६ शहरे आहेत.तेथे प्रत्यक्ष मुलाखती आणि सामूहिक चर्चेद्वारे मुस्लिम समाजाच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत.शिक्षण, राहणीमान, पायाभूत सुविधा, शिक्षण, आराेग्य, रोजगार, बँक व वित्तीय साहाय्य, शासकीय योजनांचा लाभ अशी भौगोलिकपरत्वे माहिती संकलित केली जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami