संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना ‘दे धक्का’! गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड :: राज्यातील १०७९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. १८ जिल्ह्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींपैकी ८७ जागा बिनविरोध निवडून आल्या असल्याची माहिती समोर आली असतानां, शिवसेनेसोबत गद्दारी करून शिंदे गटासोबत गेलेले आमदार भरत गोगावले यांना ग्रामपंचायत निवडणूकीत धक्का बसला आहे. भरत गोगावले यांच्या खरवली गावचे सरपंचपद महाविकास आघाडीकडे आले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून या गावात शिवसेनेचा सरपंच आहे.त्यामुळे यावेळेसही ग्रामस्थांनी गद्दार शिंदे गटाला धक्का देत महाविकास आघाडीला साथ दिली आहे. आमदार भरत गोगावले यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाचे आश्वासन मिळाल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मंत्रीपदही मिळाले नाही आणि आता मूळ गावातील सरपंचपदही गेले आहे.
दरम्यान, १ हजार ७९ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. याच निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली असतानाच भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. अशावेळी शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगवाले यांना ग्रामस्थांनी धक्का दिलाय. भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. येथे शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमदेवाराचा पराभव झाला. काँग्रेस समर्थक चैतन्य महामुनकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे, शिंदे गटाला हा धक्का मानला जातो. भरत गोगवले हे सध्या शिंदे गटातील आघाडीचे नेते असून विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोदही आहेत. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
खरवली काळीज ग्रामपंचायतीत एकूण १३ सदस्य १ सरपंच एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चैतन्य उर्फ बाबू महामुनकर विजय झाले. बाळासाहेबांची शिवसेना उमेदवार समीर महामुनकर यांना १०५३ तर महाविकास आघाडीचे विजय उमेदवार बाबू , महामुनकर यांना ११७६ मते मिळाली. यामध्ये शिवसेनेचे १० सदस्य महाविकास आघाडीचे २ सदस्य तर १ अपक्ष सदस्य निवडून आला आहे. शिंदे गटाचे १० सदस्य निवडून आले, पण सत्ता महाविकास आघाडीकडे गेली. कारण, जनतेतून सरपंच निवड असल्याने शिंदे गटाला हा फटका बसला आहे.
दरम्यान, आता सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. त्यामुळे, निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami