संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांकडून ३०० बसेस बुक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात गर्दी जमवण्याची चढाओढ सुरु असतानाच शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबईसाठी ३०० बसेस बुक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला पत्र पाठवले आहे.सोयगाव आणि सिल्लोड मतदारसंघातून या बसेस हव्या असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तर शिंदे सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातून चक्क ३ रेल्वेगाड्या या दसरा मेळाव्यासाठी बुक केल्या आहे.तसेच शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराने २-३ हजार लोक मेळाव्याला आणण्याचे नियोजन केले आहे.

औरंगाबादच्या सोयगाव-सिल्लोड मतदारसंघातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे ३०० एसटी बसेसची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड-सोयगावच्या आगार प्रमुखांना पत्र सुद्धा पाठवले आहे.सत्तार यांनी या पत्रात म्हटले आहे की, ५ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते,शिवसैनिक जाणार असून यासाठी आपल्या महामंडळाकडून ३०० नवीन,सुसज्ज व चांगल्या अवस्थेतील बसेसची आवश्यकता आहे. यासाठी असणारी रीतसर प्रक्रिया करण्यास आम्ही तयार आहोत.तरी आपल्या महामंडळाकडून ३०० नवीन,सुसज्ज व चांगल्या अवस्थेतील बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.

दरम्यान,शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून जोरदार तयारी करण्यात येत असून, बसेस बुक करण्यात आल्या आहे. ज्यात जळगाव ३ रेल्वे गाड्या, उस्मानाबाद ६० बसेस, नाशिक ४०० बसेस, अकोला २० ट्रॅव्हल्स बसेस, नागपूर १० बसेस, रत्नागिरी १०० बसेस, औरंगाबाद सिल्लोड-सोयगाव ३०० बसेस उपलब्ध राहणार आहेत.तसेच पाच आमदार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून ३ रेल्वेगाड्या बुक केल्या असून एका गाडीचे प्रवास भाडे २५ लाख याप्रमाणे ७५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami