संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांना ईडीकडून दिलासा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. टॉप्स ग्रुपविरोधातील क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला आहे.त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील ईडी केस बंद होणार आहे.प्रकरणात कोणताही फौजदारी खटला दाखल होत नसल्याचे क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय चांदोले आणि शशिधरन यांनी सुटकेसाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाकडून दोष मुक्तीसाठीचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. टॉप्स ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि संशयित आरोपी एम. शशिधरन यांचे वकील कुशाल मोर यांनी दावा केला की क्लोजर रिपोर्टमध्ये हस्तक्षेप करण्याचा ईडीला अधिकार नाही. त्यामुळे वरच्या कोर्टात अपील करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ईडी या प्रकरणाची कार्यवाही पुढे चालू ठेवू शकत नाही असा त्यांनी दावा केला. सरनाईक यांच्या विरोधातील ईडीचा ससेमीरा टळला आहे.

सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने धाडी टाकून कुटुंबीयांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी तकालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरनाईक यांनी पत्र लिहिले होते. प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार केली आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यानंतर ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बंडखोरी करत, शिंदे गटात प्रवेश केला. विरोधकांनीबंडखोर आमदारांवर ईडीच्या भितीपोटी बंडखोरी केली असे आरोप केले होते.आता हे आरोप खरे होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami