मुंबई- बीकेसीमध्ये शिंदे गटाचा झालेल्या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून कार्यकर्ते आले होते. कार्यकर्त्यांच्या प्रवासाठी एसटी बस आरक्षित करण्यात आल्या होत्या.त्यासाठी एसटीला शिंदे गटाकडून 10 कोटी रुपये रोख देण्यात आले होते. यासंदर्भातील याचिकेचे आता जनहित याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश आज हायकोर्टाने दिले असून आता या प्रकरणाची रितसर न्यायालयीन चौकशी होईल.
शिंदे गटाच्या बीकेसी मैदनावर झालेल्या दसरा मेळाव्या विरोधात वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली होती. दाखल केलेली याचिकेला जनहित याचिकात रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने आज दिले आहेत. दसरा मेळावाच्या बिकेसीमध्ये आयोजनासाठी दहा कोटी रुपये रोख एस टी महामंडळाला देण्यात आले होते. याचिकेत आयकर विभागाद्वारे या प्रकारांची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली होती.