संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या पीएसओ आणि पी.ए.यांच्यावर होणार कारवाई !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे हे बंडाची तयारी करत असतानां, याची कानोकान कोणालाही खबर न लागता अनेक आमदारांना घेऊन शिंदे सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले आणि याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी,ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या निकालादिवशी सरकार आणि गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन पसार झाले. आधी सूरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला. त्यानंतर देखील इतर काही आमदारही त्यांच्या गटात सामील झाले. याची माहिती गृहविभाग किंवा पोलीस विभागाला कळू शकली नाही. त्यामुळे आता या सर्व आमदारांच्यासोबत असलेल्या पीएसओ, कमांडे आणि कॉन्स्टेबलवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत गृहविभागावर नाराजी व्यक्त केली होती.

विशेषतः बंडखोरीचा हा संपूर्ण डाव एक-दोन दिवसात नक्कीच आखलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून याची योजना आखण्यात येत होती, अशीही माहिती आता समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या गुप्त बैठका व्हायच्या, पण त्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या-त्या जिल्ह्यातील आमदारांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत फूट पाडतील याची माहित शासकीय यंत्रणांना मिळू नये याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केल्यानांतरच ही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami