संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

शिंदेंच्या मेळाव्यात छात्रभारतीतर्फे शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. या निर्णयाचा विरोध होत असून,बीकेसीच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी आणि खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. 

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असा आग्रह धरला जातो. मात्र, दुसरीकडे मराठी शाळांना टिकवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे इतर ठिकाणी समायोजन करून त्या बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. याचे पडसाद आज बीकेसीतील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात पाहायला मिळाले. या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी बीकेसीच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी आणि खासगी बसेसला पोस्टर लावत 0 ते 20 पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami