संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

शिंदखेड्यात आज बालाजी रथोत्सव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिंदखेड- आश्विन कोजागिरी पौर्णिमेला उद्या रविवारी ९ ऑक्टोंबर रोजी शिंदखेडमध्ये बालाजी रथोत्सवाचे आयोजन केले आहे. १५२ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव भाविकांच्या आकर्षणाचा आणि श्रद्धेचा मुख्य केंद्र बिंदू आहे.
दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला शिंदखेडमध्ये बालाजीचा रथोत्सव असतो. यावेळी उद्या तो साजरा केला जाणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवरून रथाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सोमवारी १० ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता बालाजीचा पालखी सोहळा होणार आहे, अशी माहिती मंदिराचे मठाधिपती मेघश्याम बुवा यांनी दिली. बालाजीची रथ मिरवणूक रथ चौक, शनी गल्ली, गांधी चौक, देसाई गल्ली या मार्गाने काढण्यात येणार आहे. १५२ वर्षांची ही परंपरा आहे. येथील रथोत्सव विजयादशमीपासून सुरू होतो. या दिवशी बालाजी पालखीत विराजमान होऊन सीमोल्लंघनासाठी मरीआई मंदिराच्या परिसरात पोहोचतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami