औरंगाबाद :- औरंगाबादच्या सेंट फ्रांसलियन खाजगी शाळेने अचानक ५० टक्के फी वाढ केल्याने पालक संतप्त झाले होते. औरंगाबादच्या सेव्हन हिल परिसरात ही शाळा आहे. अचानक मोठ्या प्रमाणात फी वाढ केल्याचा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आज सकाळी ९ वाजल्यापासून पालक शाळेच्या आवारात शाळेविरोधात घोषणाबाजी करत होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांना शाळेने आत येऊ दिले नाही. शाळेचे गेट बंद ठेवण्यात आले होते. फी वाढीचा निर्णय शाळेने मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला. या संदर्भात पालकांच्या प्रश्नांना शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आमचे वकील तुमच्याही संवाद साधतील असा खुलासा शाळेकडून करण्यात आला आहे.