संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

शाळेनंतर पदवीधर विद्यार्थ्यांनाही
मेट्रो तिकीट दरात सवलत मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर : नागपूर मेट्रोकडून सलग होणाऱ्या दरवाढीमुळे प्रवाशी संख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. घटती प्रवाशी संख्या लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांनंंतर आता पदवीधर,आयटीआय , डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासूनच या तिकीटाची अंमलबजावणी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखुवून ही सवलत मिळणार असल्याचीही माहिती नागपूर मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर मेट्रो प्रशासनकडून सततच्या दरवाढीमुळे प्रवाशी संख्या एक लाख ४० हजारावरून ८० हजारावर पोहोचली. एकूणच याचा फटका मेट्रोलाच सहन करावा लागला. त्यामुळे ७ फ्रेब्रुवारीपासून १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत सुरू करण्यात आल्यांनतर अनेक विद्यार्थी मेट्रो प्रवासाच्या दिशेने वळल्याचे समोर आले. त्यामुळे आता ही सवलत पदवी,आयआयटी आणि पॉलिटेक्निक यांसह इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात ३० टक्के सूट मिळणारआहे.
विद्यार्थ्यांसाठी ही सेवा १३ फ्रेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करताना विद्यार्थ्यांना कॉलेजमधून एक फॉर्म तिकीट खिडकीवर जमा करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो तिकीट खिडकीवर कॉलेजचे आयडी कार्ड, बोनाफाईट देणे गरजेचे आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना तिकीटाच्या दरात सवलत दिली जाणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनकडून देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या