संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

शार्प शूटर संतोष जाधवचा अरुण गवळी टोळीशी संबंध!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंडीगढ़- पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा संबध कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेला असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पंजाब पोलिसांनी ओळखलेल्या 8 शार्प शूटर्सपैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असून तो पुण्याचा रहिवासी आहे. 29 मे रोजी मुसेवालावर झालेल्या गोळीबारामध्ये त्याचा सहभाग होता.

संतोष जाधव यांना खास मुंबईहून पंजाबला बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत सौरभ महाकाळही आला होता. या नव्या माहितीनंतर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे.तसेच मुंबई पोलिसांकडून सहकार्य मागितले आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी जाधवचा शोध सुरू केला आहे.अरुण गवळी सध्या महाराष्ट्रातील तुरुंगात आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आतापर्यंत गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर येत होते. लॉरेन्स गँगचा कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्यात आता गवळी टोळीचे नाव समोर आल्याने लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 राज्यांतील 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यामध्ये पंजाबमधील तरनतारन येथील जगरूपसिंग रूपा व मनप्रीत मन्नू, हरियाणातील सोनीपत येथील प्रियवर्त फौजी व मनप्रीत भोलू, महाराष्ट्रातील पुणे येथील संतोष जाधव व सौरव महाकाल,राजस्थानच्या सुभाष बानुदा यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami