संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

शहांच्या मुंबई दौऱ्यासाठी गाडीचे सारथ्य फडणवीसांच्या फेव्हरेट चालकाने केले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात होता. या दौऱ्यावेळी सह्याद्री अतिथीगृह, लालबागचा राजा, आशिष शेलाराचे वांद्रेतील घर, त्यानंतर फडणवीसांचा सागर बंगला, मग पुन्हा मुंबई विमानतळ असा भरगच्च कार्यक्रम ठरला होता. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी खास नागपुरातून चालकाला बोलावण्यात आले होते. हे चालक उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फेव्हरेट असल्याने खास मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह यांच्या गाडीचे सारथ्य नागपूर पोलीस दलातील नायक पोलीस कॉन्स्टेबल शरद पांडे यांच्याकडून केले गेले.अर्थात दौरा सुरळीत पार पडावा यासाठीच थेट नागपुरातून चालकाला बोलावण्यात आल्यामुळे आता हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः शरद पांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून नागूपर पोलीस दलात कार्यरत आहेत. इतकेच काय तर शरद पांडे गेल्या अनेक वर्षांपासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चालक आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ते फेव्हरेट ड्रायव्हर असल्याचेही बोलले जात आहे. कदाचित त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चालकास नागपुरातून खास मुंबईत विशेष कामगिरीसाठी बोलावण्यात आले होते. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर शरद पांडे यांनीच गाडी चालवली होती. ते एक सराईत चालक म्हणून पोलीस खात्यात ओळखले जातात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami