संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

शस्त्र विक्रीवर नियंत्रण आणले
अमेरिकेत ऐतिहासिक कायदा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क – न्यूयॉर्क आणि उवाल्डे (टेक्सास) येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर अमेरिकन सरकारने आता शस्त्र विक्रीवर नियंत्रण आणले असून याबाबतचा ऐतिहासिक कायदा अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याच्या बाजुने 65 तर विरोधात 33 मतं पडली. या कायद्यात बंदूक आणि रायफल परवान्यासाठी मानसिक आरोग्याबाबत प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे.
बंदूक आणि रायफल खरेदीसाठी वयोमर्यादा वाढवली असून ही वयोमर्यादा 21 वर करण्यात आली आहे. 15 पेक्षा जास्त गोळ्यांची क्षमता असलेल्या मॅगझिनच्या विक्रीवर बंदी घालण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली.रिपब्लिकन या विरोधी पक्षाच्या खासदारांचा या विधेयकाला विरोध होता.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बंदुकीच्या अधिकारांवर निर्बंध घालणारा न्यूयॉर्कचा कायदा रद्द केला होता. न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन लोकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि हा अधिकार मर्यादित करणे संविधानाच्या 14 व्या दुरुस्तीचे उल्लंघन करते. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज शस्त्र विक्रीवर नियंत्रण आणण्याबाबत कायदा अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami