संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारची सत्ता पणाला लागली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच इतर पक्षांच्या हालचालीही वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांची बैठक घेतली त्यानंतर राज्यीतील सर्व आमदारांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने त्यांचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना राज्यात पाठवले आहे. काँग्रेस आमदारांसोबत ते चर्चा करत आहेत. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवारांचीही भेट घेतली. पवारांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि आमच्यात येऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुका आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली, असे म्हटले. दरम्यान, पवारांनी महाराष्ट्रातल्या घडामोडींचा उल्लेखही केलेला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami