संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

शरद पवारांच्या आश्वासनानंतरही एमपीएससी विद्यार्थी आंदोलनावर ठाम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे:- एमपीएससीचे विद्यार्थी गेले तीन दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्त्यांना केवळ फोनवर आश्वासने दिली आहेत. त्यातच मंगळवारी रात्री अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अचानक आंदोलनस्थळी दाखल होत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. या प्रश्नी स्वत: जातीने लक्ष घालून तो सोडवणार असल्याचे सांगितले. तेथून मुख्यमंत्र्यांना फोन लावून विद्यार्थी शिष्टमंडळासह भेटीची वेळही ठरवली. त्यामुळे हा विद्यार्थ्यांची मागणी येत्या दोनेक दिवसात मान्य होण्याची शक्यता आहे. मात्र परीक्षा पॅटर्न पुढे ढकलण्याबाबत नोटिफिकेशन जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे.

मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानक आंदोलनस्थळी पोहचले. त्यामुळे आंदोलनस्थळाचे वातावरण काही काळ बदलून गेले होते. विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. तेथील उपोषणाला बसलेल्या पाच विद्यार्थ्यांचीही पवारांनी भेट घेतली. पवार म्हणाले की, येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे तुमची बाजू मांडणे आवश्यक आहे असेही शरद पवार म्हणाले होते. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचे शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या आंदोलनात या शिष्टमंडळात कोण असेल याची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या