संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज ‘डिलिट फॉर मी’ केल्यावर ‘अनडू’ येणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – अतिशय सोपे आणि झटपट चॅटिंगमुळे व्हॉट्सअ‍ॅप हे प्रचंड लोकप्रिय आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांना नव-नवीन फिचर्स दिले जातात. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपच्या पुढच्या व्हर्जनमध्ये आपण पाठवलेला मेसेज डिलिट करण्याबाबत एक नवे फिचर येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

टेलिग्राममध्ये जसे मेसेज पाठवल्यावर एडिट करण्याचे फिचर उपलब्ध आहे तसे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नाही. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एकदा मेसेज पाठवल्यावर तो पुन्हा सुधारता येत नाही. तसेच एखादा मेसेज डिलिट करताना तो चुकून ‘डिलिट फॉर मी’ असा केला, तर इतरांना तो दिसतच राहतो. मग आपल्याला इतरांसाठी तो डिलिट करता येत नाही कारण केवळ आपल्यासाठीच तो मेसेज डिलिट झालेला असतो. याला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचरवर काम करत आहे. हे फिचर सुरू झाल्यास चुकून मेसेज ‘डिलिट फॉर मी’ केला गेला. तर स्क्रीनच्या खालच्या बाजूला काही वेळ ‘अनडू’चे बटण दिसेल. ते दाबल्यावर डिलिट केलेला मेसेज आपल्याला दिसेल आणि मग आपण तो ‘डिलिट फॉर एव्हरीवन’ करू शकू.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami