मुंबई – जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअपमध्ये त्रुटी आढळली आहे. या त्रुटीमुळे लाखो वापरकर्त्यांचे मोबाईल क्रमांक इंटरनेटवर उपलब्ध झाले आहेत. हे क्रमांक कोणीही एक्सेस करू शकतात, असा धक्कादायक दावा हॅकरने केला आहे. मात्र ही त्रुटी सामान्य असून ती दूर करता येऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
व्हाट्सअपमध्ये त्रुटी आढळली आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांचे मोबाईल नंबर इंटरनेटवर पब्लिकली उपलब्ध झाले आहेत. ते कोणीही एक्सेस करू शकतात, अशी माहिती हॅकर अविनाश जैन यांनी दिली. यासंदर्भात आपण कंपनीला ई-मेल पाठवला. पण त्यांनी हा सुरक्षेचा दोष असल्याचे मान्य केले नाही, असे त्यांनी सांगितले. जैन यांनी आतापर्यंत गुगल, याहू, नासा, व्हीएमवेअरसारख्या कंपन्यांकडे बग्जविषयी तक्रारी करून बक्षिसे मिळवली आहेत. मात्र व्हाट्सअपची ही त्रुटी कंपनीने मान्य केलेली नाही. ती सामान्य असून येत्या काळात दूर करता येऊ शकते, असे कंपनीने म्हटल्याचे जैन यांनी सांगितले.