संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

व्हेंटिलेटर वेळेवर न मिळाल्याने नागपूर रुग्णालयात मुलीचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर : आशियातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय अशी नागपूर मेडिकलची ओळख आहे. याच मेडिकल रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवी राजू बागेश्वर असे या 17 वर्षाच्या मृत मुलीचे नाव असून, ही यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथे राहणारी रहिवाशी होती.रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातल्या वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती बिघडल्याने तिला 15 सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 48 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.वैष्णवीच्या दोन्हीही किडनी निकामी झाल्या होत्या. तिला श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे वैष्णवीला व्हेटिंलेटरची आवश्यकता होती. मात्र, रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने अम्बू बॅगवर तिला ठेवण्यात आले होते. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर शरद कुचेवार यांनाही कळवण्यात आले होते. पण त्यांनाही व्हेंटिलेटरची सोय करून देता आली नाही. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अनेक तास वाट पाहूनही तिला व्हेंटिलेटर मिळाला नाही. आई-वडिल 20 तास अॅम्बु बॅगचा फुगा दाबून लेकीला कृत्रिम श्वास ते देत होते.त्यानंतर अखेर शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.मुलीच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी आक्रोश केला.  वैष्णवीच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूला रुग्णालयाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami