संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

वेळेत उपचार न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या सरपंचासह जावयाचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुरबाड- मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी सरपंच महिलेसह त्यांच्या जावयाला विषारी सर्पदंश झाल्याने त्यांना रस्त्याअभावी झोळीतून घेऊ जाताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना मुरबाड तालुक्यातील ओजिवले कातकरीवाडीत घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी गावपाड्यात रस्त्याअभावी आदिवासींच्या मृत्यूचे सत्र सुरुच असल्याचा आरोप आता जिल्ह्यातील आदिवासी बांधव करीत आहेत.
मुरबाड शहरापासून २७ किमी अंतरावरील धसईबाजार पेठे नजीक ओजिवले गावाच्या हद्दीत दीड किमी.अंतरावर कातकरवाडी आहे. या वाडीत २० कुंटुबातील ६० आदिवासी बांधव राहतात. या पाड्यातील अदिवासींना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दीड किमी.पायपीट करावी लागते.त्यातच ५ सप्टेबर रोजी पहाटेच्या चार वाजल्याच्या सुमारास या पाड्यातील सुभाष टिकाराम वाघ (३५) यांना घरातच झोपेत असताना विषारी सापाने दंश केला. या घटनेची माहिती मिळताच त्यांना टोकावडे येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईक झोळीतून घेऊन गेले. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यास उशीर झाल्याने त्यांच्या अंगात विष भिनले. त्यांचा मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे मृत सुभाष यांच्या सासू बारकाबाई किसन हिलम (५५) ह्या गावच्या सरपंच आहेत. त्यांनाही ८ ऑगस्ट रोजी घरातच विषारी सापाने दंश केला होता. त्यामुळे त्यांनाही नातेवाईकांनी रस्त्याअभावी झोळीतून, चिखल झालेल्या रस्त्यातून पायपीट करत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र रस्ता नसल्याने उशीर झाला. त्यामुळे सापाचे विष त्यांच्या रक्तात भिनले होते. त्यातच मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात नेताना उशीर झाल्याने त्यांचाही मृत्य झाला. केवळ रस्त्याअभावी दोघांचे बळी गेल्याची खंत कुंटुब प्रमु़ख किसन राजाराम हिलम यांनी व्यक्त केली. जर या वाडी येण्या-जाण्यासाठी रस्ता असता तर सरपंच असलेल्या माझ्या पत्नीचा व जावयाचा प्राण वाचला असता असेही त्यांनी सांगितले.तसेच रस्त्याअभावी आणखी बळी जाण्याची वाट न पाहता शासनाने आता तरी आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami