संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले? आशिष शेलार यांचा शिवसेनाला प्रश्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पावरून मागली काही दिवसांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक याच्यातील आरोप प्रत्यारोप सुरू आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवली, अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी १० टक्के लाच द्यावी लागत होती, इतका भ्रष्टाचार बोकाळला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प दीड लाख कोटींचा होता, मग इथं किती टक्के मागितले होते? १० टक्क्यांनुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतल्या रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे, जनतेसमोर सत्य यायलाच हवे.”

आशिष शेलार यांचे आरोप खोटे असून हा प्रकल्प गुजरातेत कसा गेला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. शिवसेना नेत्या मनिषा कांयदे यांनी देखील शेलारांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. त्या म्हणतात की, खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे ही शिकवणच त्यांना त्यांच्या नेत्यांनी दिली आहे. टक्केवारी, सरासरी या गोष्टी त्यांच्या मनात येतात कुठून? असा सवाल देखील मनिषा कायंदे यांनी केला आहे. पांढऱ्या पावलांच सरकार आले आणि हा प्रकल्प गुजरातला गेला. आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्या दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीकडून पुण्यात लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले तर मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना मार्फत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami