संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

वेदांताचा प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका! अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती केली. तसेच अजित पवारांनी आपल्या पत्रातून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
अजित पवार यांनी पत्रात म्हटले की, वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रिकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचे कळते. वेदांता व तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60:40 असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे 2 लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे 1.5 लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली. जागा निवडीसाठी एकूण 100 मुद्द्यांचा विचार करुन त्यांनी तळेगाव टप्पा 4 ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टिव्हिटी, शी असणारी कनेक्टिव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील 1000 एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगावच्या तुलनेत काहीच नाही. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार () करणार आहेत, असे कळते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे. पंरतु ही गुंतवणूक जाऊ देऊ नये. यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. कारण यामधून मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे, ही विनंती. असे अजित पवार पत्रात म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami