सिंधुदुर्ग- एसटी महामंडळाच्या कोकण प्रदेश सिंधुदुर्ग विभाग वेंगुर्ला आगारामार्फत २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर कालावधीत अष्टविनायक दर्शन यात्रा कार्यक्रम वेंगुर्ला आगारामार्फत दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या मागणीवरून सुरू करण्यात आला आहे.वेंगुर्ले आगाराच्या या उपक्रमाला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. या विशेष बस यात्रेचे उद्घाटन वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आगार व्यवस्थापक शेवाळे स्थानक प्रमुख निलेश वारंग,एल डी पवार,चालक,वाहक, यांत्रिक कारागिर,प्रशासकीय कर्मचारी,व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यात्रेची संकल्पना वारंग यांची असून यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली. प्रवाशांना चांगली सेवा देण्यात यावी यासाठी विठाई बस सोडण्यात आली. अजूनही प्रवासी उपलब्ध झाल्यास अजूनही बस सोडण्यात येतील अशी माहीती यावेळी आगार व्यवस्थापक शेवाळे यांनी दिली.ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आगारातील मकरंद होळकर,गूरू गावडे,पप्पु ताम्हणेकर,नंदु दाभोलकर,आशिष खोबरेकर,अमित मसूरकर, विठ्ठल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.