संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

वीज टंचाईने बेहाल पाकिस्तानात रात्री 10 नंतर लग्न सोहळ्यांवर बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वापर कमी व्हावा या उद्देशाने राजधानी इस्लामाबादमध्ये 8 जूनपासून रात्री दहा वाजल्यानंतर लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इस्लामाबादमधील लोकांना विवाह सोहळा रात्री दहाच्या आधीच आटपून घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर रात्री 8.30 नंतर सर्व बाजार बंद करण्याचे आदेशही पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने दिले आहेत.

सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये इंधनाबरोबरच विजेचे दरही झपाट्याने वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत विजेचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने काही नवे निबर्र्ंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार देशात दररोज साडे तीन तास लोडशेडिंग करण्याचे आदेश दिले आहेत. 30 जूनपयर्र्ंत लोडशेडिंग होणार असून त्यानंतर दररोज हे दोन तास करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. तसेच सरकारी कार्यालयांत 6 दिवसांचा आठवडा 5 दिवसांचा करण्यात आला आहे. सरकारी कर्मचार्‍यांना गाडी खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचार्‍यांच्या इंधन पुरवठ्यात 40 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सर्व सरकारी कर्मचार्‍यांना शुक्रवारी वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रात्री 8.30 वाजता मार्केेट बंद करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इस्लामाबादमध्ये रात्री 10 नंतरच्या विवाह सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami