संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

विशाळगडवरील अतिक्रमण हटवणार! आश्वासनांनतर शिवप्रेमींची कार सेवा रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमण वाढल्याने शिवप्रेमीकडून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण निश्चितपणे कायमस्वरुपी काढणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावारांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील शिवप्रेमीकडून अतिक्रमण काढण्याकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी नियोजित केलेली कार सेवा रद्द केली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेल्या विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन केले आहे.

अतिक्रमणधारकांच्या जागेची मोजणी झाली आहे. त्यांना नोटीस दिली आहे. गडावर जेसीबीसारखी मशीन घेऊन जाता येत नाही. त्यामुळे हे सर्व कामे मजुरांकडूनच करुन घ्यावी लागतील. अतिक्रमण काढताना शांततेने आणि कायद्याने काढले जाईल. कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. यासाठी शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींनीही सहकार्य करावे.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, ‘विशाळगडावरील मद्य विक्री, गांजा विक्री, चरस विक्री पूर्ण बंद केली जाईल. याशिवाय, पशु, पक्षांची होणारी कत्तल थांबवली जाईल. यासाठी नियोजन केले आहे. गडावर नशा करणाऱ्या नशेबाजांवर फौजदारी दाखल केली आहे. त्यानंतर रेखावार आणि शैलेश बलकवडे यांच्या आश्वासनांनतर शिवप्रेमींची कार सेवा रद्द केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या